Video- डेव्हिड वॉर्नरने मुंबईच्या रस्त्यावर लुटला गली क्रिकेटचा आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेसाठी भिडणार आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, त्यातील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यामुळे आता टीम इंडियाने सराव सुरू केला आहे.

दरम्यान, मुंबईच्या रस्त्यांवर ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर गली क्रिकेट खेळताना दिसला. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्रामवर मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

डेव्हिड वॉर्नर वेळोवेळी त्याची हिंदुस्थानबद्दल असणारी आपुलकी दाखवत असतो. मग ते गाण्यांमधून असो किंवा त्याच्या रील्समधून तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. पण वॉर्नरला मुंबईच्या रस्त्यावर अशा प्रकारे लहान मुलांसोबत गली क्रिकेट खेळताना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी तिथल्या लोकांनी वॉर्नरसोबत फोटोही क्लिक केले. यामुळे डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा हिंदुस्थानी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)