दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात मंडळ अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या आठवड्यात सदानंद कदम यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. कदम यांना जामीन होण्याआधीच तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक ईडी कडून अटक करण्यात आली. कदम, देशपांडे यांच्या नंतर तत्कालीन मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे.