राज्य सरकार पालिकेच्या घोटाळेबाज प्रशासनाला पाठिशी का घालतेय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या घोटाळ्यावरून राज्य सरकार व पालिकेच्या प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

”पालिका प्रशासनाच्या अखत्यारित एकावर एक घोटाळे होतायत. माझा सवाल आहे राज्य सरकारला की ते  या पालिकेच्या घोटाळेबाज प्रशासनाला पाठिशी का घालत आहेत. रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन घोटाळा. महापौर नाही + जनतेने निवडलेले प्रतिनिधी नाही = भ्रष्टाचारी, राज्य सरकारच्या कंट्रोलमध्ये असलेले अपारदर्शक पालिका प्रशासन”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.