एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना पुन्हा ‘व्हिआरएस’ची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियामधील नॉन-प्लाइंग कर्मचाऱयांसाठी टाटा समूहाने पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची (व्हिआरएस) ऑफर दिली आहे. ही नवीन ऑफर 30 एप्रिलपर्यंत खुली असून 2100 कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

एअर इंडियात पहिल्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या व्हिआरएस योजनेत पात्र असलेल्या 4200 कर्मचाऱयांपैकी 1500 जणांनी लाभ घेतला होता. दुसऱया टप्प्यातील योजनेसाठी 2100 कर्मचारी पात्र असतील. सध्या, एअरलाइनमध्ये फ्लाइंग आणि नॉन फ्लाइंग स्टाफसह सुमारे 11,000 कर्मचारी आहेत.

40 वर्षे वयोमर्यादेची अट

स्वेच्छा निवृत्तीची ऑफर 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱया आणि एअरलाईनमध्ये कमीत कमी पाच वर्षे कायमस्वरूपी सेवेत असणाऱया अधिकाऱयांसाठी आहे. लिपिक किंवा नॉन स्कील श्रेणीतील कर्मचारी ज्यांनी किमान पाच वर्षे सेवा केली असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.