Dis’Qualified MP राहुल गांधी यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूरत येथील न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस रस्त्यावर उतरली असून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे काँग्रेसने ‘संकल्प सत्याग्रह’ (Sankalp Satyargrah) सुरू केला असून दुसरीकडे राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला ट्विटर बायो अपडेट केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये ‘अपात्र लोकसभा खासदार’ (Dis’Qualified MP) असे लिहिले आहे.

खासदारकी रद्द

अखेर मोदी सरकारने राजकीय डाव साधला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार वा आमदाराला दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाली, तर सदस्यत्व रद्द केले जाते. मात्र सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि अवघ्या 24 तासांच्या आतच लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केली. धक्कादायक म्हणजे न्यायालयाने राहुल गांधींना तत्काळ जामीन मंजूर करताना शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली असतानाही तत्परतेने ही कारवाई झाली.

‘मोदी म्हणजेच भ्रष्टाचार’, राहुल गांधींवरील कारवाईनंतर भाजपच्या महिला नेत्याचे ट्वीट व्हायरल