
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
प्रवासात तुमच्या सामानाची, तुमच्या त्वचेची आणि तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर तुमचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि लक्षात राहणारा असा असेल.
प्रवासाला निघताना महत्त्वाचे साहित्य ठेवा बॅगेत –
प्रवासाला निघताना बऱ्याच वेळा अगदी एखाद दिवस अगोदर किंवा दोन दिवस अगोदर फेशियल केले जाते किंवा वॅक्सिंग, पेडिक्युअर, मॅनिक्युअर यांचा वापर केला जातो. तर तसे न करता तुम्ही या सगळ्या गोष्टी निदान आठवडा ते पंधरा दिवस अगोदर करा. जेणेकरून त्वचेवर जर काही त्याचा परिणाम होणार असेल तर तो परिणाम साधारण पाच-सहा दिवसांनंतर मावळतो आणि पुन्हा आपली स्किन नॉर्मल होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आधीच केलेल्या बऱ्या तसेच प्रवासाला निघताना अनेक गोष्टी घ्यायच्या असतात, अनेक गोष्टी करायच्या असतात. तर या सगळय़ाची प्रथम तुम्ही यादी बनवून घ्या. जेणेकरून निघण्याअगोदर तुम्हाला काय काय करायचे आणि निघताना तुम्हाला तुमच्या बरोबर काय घ्यायचे व तुम्हाला काय काय करून निघायचे याची सगळी माहिती तुमच्या यादीमध्ये असेल आणि त्याप्रमाणे बॅग भरताना फार त्रास होणार नाही.
प्रवासाला निघताना स्वतःला नियमित लागणारे महत्त्वाचे साहित्य स्वतःजवळच्या सॅकमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा आणि ही बॅग किंवा ही पर्स नेहमी जवळ बाळगा. त्यातच तुम्हाला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जसे की, ट्रव्हलिंगची
डॉक्युमेंट्स किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या पर्समध्ये किंवा त्या बॅगेमध्ये ठेवा. ज्या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणाला शोभतील असे कपडे तुम्ही सोबत न्या. तसेच तिथल्या वातावरणालाही सूट होतील असे कपडे तुम्ही तुमच्या जवळ बाळगा. जेणेकरून अचानक तिथल्या वातावरणात काही बदल घडला तर त्या त्या प्रकारचे कपडे तुमच्याकडे असायला हवेत.
भटकंती करताना अनेक वेळा आपल्याला त्या त्या ठिकाणची फोटोग्राफीदेखील करायची असते आणि ही फोटोग्राफी करत असताना स्वतःचेही फोटो काढायचे असतात आणि त्यात आपल्याला छानही दिसायचे असते. तेव्हा विस्कटलेले केस किंवा अजिबातच मेकअप नसलेला चेहरा तुमच्या कॅमेऱयाला छान दिसत नाही आणि मग अशा वेळी तुमच्याकडे स्वतःचा छोटासा मेकअप किट असणे गरजेचे आहे, तर पिकनिकसाठी तुमच्याकडे वेगवेगळ्या क्लिप्स, काही रबर बॅण्डस् किंवा हेअर एसेसरीज, स्कार्फ असे जर तुम्ही जवळ ठेवले तर तुम्हाला तुमचा लूक वेगवेगळय़ा प्रकारे चेंज करता येतो.
तसेच तुम्हाला जर काही ठिकाणी गॉगलचा वापर करायचा असेल तर वेगवेगळय़ा टाइपचे गॉगल्स तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला काही ठिकाणी लेन्सेस वापरायचे असतील तर मात्र लेन्स घेताना प्रॉपर त्याचे सोल्युशनही तुम्ही बरोबर घेतले तर तुम्हाला त्या नीट वापरता येतील. तिथल्या वातावरणाचा अंदाज घेऊन बॉडी लोशनदेखील तुम्ही बरोबर घ्या. या सगळय़ा वस्तू जेव्हा तुम्ही कॅरी करता तेव्हा त्यासाठी वेगवेगळे पाऊच बनवा. जेणेकरून प्रत्येक पाऊचमध्ये वेगवेगळय़ा वस्तू राहिल्यामुळे त्या तुमच्या पटकन हाताशी लागतील. परदेशात फिरायला जाताना किंवा ट्रेकिंगला जात असाल तर चांगल्या कंपनीचे शूज तुम्ही विकत घ्या. जेणेकरून तुमच्या पायाला त्रास होणार नाही.
अशा तऱहेने तुम्ही तुमच्या सामानाची, तुमच्या त्वचेची, तुमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर तुमचा प्रवास सुखकर, आनंददायी, लक्षात राहणारा आणि भटकंतीतही आपण तेवढेच सुंदर दिसलो याचा भरभरून आनंद देणारा असेल. तसेच हा प्रवास झाल्यानंतर सोशल मीडियावरील तुमचे फोटोही इतरांचे लक्ष वेधून घेतील आणि तुम्ही इतरांना त्यांच्या प्रवासाच्या वेळेस छान प्रकारे गाइड करू शकाल.
मेकअप किट बनवा
प्रवासासाठी तुम्ही तुमचा एक छोटासा किट बनवा. ज्याच्यामध्ये तुमच्या चेहऱयाला सूट होईल असे मॉइश्चरायझर सनक्रीम ठेवा. त्यानंतर तुम्ही फाऊंडेशन किंवा बीबी क्रीमचा वापर करा आणि त्यावर तुम्ही एखादा कॉम्पॅक्ट जो तुम्हाला तुमच्या स्किनला सूट होईल असा लावा. यामध्येही तुम्ही लॉन्ग लास्टिंग फाऊंडेशन किंवा लॉन्ग लास्टिंग कॉम्पॅक्टचा वापर केला तर तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल. तसेच लाइट, डार्क ब्लश ऑन तुम्ही वापरू शकता. लिपस्टिक ही लॉन्ग लास्टिंग असल्यास जास्त काळ टिकेल. काजळाचा जास्त वापर करू नका. कारण बऱयाच वेळा हे काजळ काही तासांनंतर पसरण्याची भीती असते. तेव्हा तुम्ही जर वॉटरप्रूफ आयलायनर वापरले तर ते जास्त चांगले. तसेच तुमच्या या किटमध्ये वेट ऍण्ड ड्राय टिशू ठेवा. तसेच मेकअप रिमूव्हरही ठेवले तर ते जास्त चांगले किंवा एखादे बेबी ऑइल किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नॉर्मल ऑइलनेदेखील तुमचा मेकअप काढू शकता. नेल फायलर, नेलपेंट रिमूव्हर या गोष्टीदेखील तुमच्या या किटमध्ये समाविष्ट केल्या तर जास्त चांगले होईल.

























































