क्रिकेट बेटिंगप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तान सामन्यावर बेटिंगप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट-12 ने अटक केली. सुशील अग्रवाल ऊर्फ सुशील भाईंदर असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली गेली होती. त्या स्पर्धेदरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना खेळवला गेला होता. त्या सामन्यावर बेटिंग होणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीनंतर दादर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारला तेव्हा एक जण नोटबुकवर लिहून घेत होता. तो अॅपच्या माध्यमातून बुकाRशी चॅट्स करत होता. सुरुवातीला पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्या चौकशीत काहींची नावे समोर आली. पोलिसांनी तपास करून सात जणांना अटक केली होती. त्यानंतर या गुह्याचा तपास क्राईम ब्रँच-12 कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना सुशील भाईंदरची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने बॅटिंगच्या अॅपचे आयडी आणि पासवर्ड पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.