
नगर शहरात सावेडी उपनगरातील गजराजनगर येथे सायंकाळी झेंडा लावण्याच्या कारणातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दगडफेकीत सहाजण जखमी झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दगडफेकीच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली. शहरामध्ये घडलेला हा तिसरा प्रकार असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरमधील गजराजनगरमध्ये सायंकाळी झेंडा लावण्याच्या कारणातून दोन गट आमने-सामने आले. प्रारंभी दोन्ही गटांत बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पडसाद भांडणामध्ये झाले.





























































