
सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून या पदार्थाने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. भेंडी न्यूडल्स असे या पदार्थाचे नाव असून नेटरकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या या दिवसांमध्ये एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो म्यानमारचा असल्याचे बोलले जात आहे. या फोटोमध्ये नूडल्समध्ये भेंडी दिसत असल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. देशात नूडल्समध्ये कोबीपासून, गाजर, शिमला मिरची घातली जाते, मात्र न्यूडल्समध्ये भेंडी हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. याचमुळे सगळ्यांनी या फोटोकडे लक्ष वेधले आहे.
खरंतर, म्यानमारमध्ये न्यूडल्स प्रचंड लोकप्रिय आहेत. तिथे राहणारी लोकं न्यूडल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या न्यूडल्समध्ये घालतात. मात्र ही डिश पाहून हिंदुस्थानीयांनी मात्र नाकं मुरडली आहेत. सध्या या भेंडी न्यूडल्सचा फोटो शताब्दी नावाच्या युजरने पोस्ट केला आहे. त्या फोटोने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.
Tried some bhendi (bhindi/okra/ladies fingers) noodles 😬
Yangon, Myanmar pic.twitter.com/veNrp93LDO
— Satabdi (@satabdisambedna) April 5, 2023
फोटो शेअर करत तिने फोटोओळीमध्ये लिहीलेय म्यानमारचे भेंडी न्युडल्स ट्राय केले, या फोटोत न्युडल्सला प्लेटमध्ये सर्व्ह केले आहे. ज्यामध्ये बेबी कॉर्न आणि नूडल्ससोबत भेंडीचे मोठ मोठे तुकडे दिसत आहेत. ज्याला कोथिंबीरीने सजवले होते. दिसायला आकर्षक भेंडी न्यूडल्स पाहून नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

























































