
दारू पिऊन धिंगाना घातल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतं असतात. अनेकांना असे व्हिडीओ पाहायला आवडतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ हे थरारक असतात. सध्या सोशल मीडियावर दारू प्यायल्यानंतर घडलेल्या एका भयंकर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर देखील काटा येईल. याच कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क दारुच्या नशेत 19 व्या मजल्यावरुन खाली कोसळला, खाली पडूनही तो व्यक्ती बचावला. एवढचं नाही तर खाली पडल्यानतंर तो स्वत:च्या पायावर उभा राहून रुग्णालयात गेला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो व्यक्ती एवढ्या उंचावरुन खाली पडूनही तो जिवंत कसा असे आश्चर्य नेटकरी व्यक्त करत आहेत.
The Russian man from Voronezh fell down from 19th floor on someone’s car. Got minor injuries pic.twitter.com/NHyCS9gv9s
— Sooo Nastya (@1234friday) April 4, 2023
एखादी व्यक्ती एवढ्या उंच इमारतीवरुन खाली पडली तरी ती जिवंत राहणं अशक्य असतं. तिसऱ्या चौथ्या मजल्यावरुन कोणी खाली कोसळला तरी गंभीर दुखापत होते किंवा जीव गमवावा लागतो. मात्र सध्या समोर आलेल्या घटनेत हा व्यक्ती चक्क 19 व्या मजल्यावरुन खाली कोसळतो. त्यानंतर ज्या गाडीवर तो पडतो त्या गाडीचा चक्काचूर झाला मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी व्यक्तीला बाहेर काढले. ही घटना घडल्यावर हा व्यक्ती स्वत:च्या पायावर उभा राहून चालू लागला. रुग्णालयात जाताना हा व्यक्ती चक्क गाणं गाताना दिसला. या अपघातामुळे आसपासचे लोक घाबरले होते पण अपघात झालेल्या व्यक्तीला पाहून त्याच्यासोबत एवढा भीषण अपघात झाला असं वाटतंच नव्हतं.
दरम्यान, @lonermonkeyy नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो सोशल मिडीयावर भलताच व्हायरल झाला असून या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देताना दिसतायत. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला.























































