जगातील पहिली सायकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

>> राकेश बोडस

वाहनांमुळे जगभर प्रदूषण वाढले आहे. त्यावर अनेक उपाय शोधले जात आहेत. कोणतंही प्रदूषण न करता एक वाहन मोठय़ा प्रमाणात चालवलं जातं, ती म्हणजे सायकल.

बालमित्रांनो, ही सायकल जगात प्रथम कोणत्या देशात बनली असेल आणि ती कुणी बनविली असेल? 1817 पासून सायकल बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्कशीतल्या कलाकारांप्रमाणे दोन चाकी वाहन चालविणे सोपे नाही, पण माणसाने ते सरावाने आत्मसात केले. इ.स. 1500च्या सुमारास मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र काढणाऱया लिओनार्दो दा विन्ची या चित्रकाराच्या जिअॅन कॅप्रोट्टी याने सायकलचे चित्र काढले आहे.

जर्मन हा देश वाहन आणि तंत्रज्ञान यात आघाडीवर आहे. त्याच देशातल्या बेरॉन कार्ल व्हॉन ड्रायस याने जगातील पहिली यशस्वी सायकल 1817 मध्ये बनविली. त्यावेळी सायकलला सायकल, बायसिकल न म्हणता ‘रनिंग मशीन’ म्हणत असत. जगात जर्मनी आणि फ्रान्स या देशांत सायकल बनविण्यास सुरुवात झाली. 12 जून 1817 मध्ये सायकलने मोठा प्रवास करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं कळलं की, सायकलने एक तासात आठ मैल अंतर पार करता येते. ही सायकल त्यावेळी पूर्णपणे लाकडाची बनविण्यात आली होती. तिचं वजन त्यावेळी 22 किलो होतं. त्यानंतर ही कल्पना इंग्लंडमधल्या काही उद्योजकांना आवडली आणि त्यांनी त्यात चांगल्या सुधारणा करून 1818च्या सुमारास घाऊक सायकली बनविण्यास सुरुवात केली. 1919च्या सुमारास तर लंडनमध्ये सायकल चालविणे ही एक क्रेझच झाली होती. ती एक लंडनमध्ये

फॅशनच झाली होती. पण ती फॅशन लगेच बंद झाली. कारण लंडनमध्ये फुटपाथवरून सायकल चालविणाऱयांना दोन पौंडाचा दंड आकारण्यात येऊ लागला.

हिंदुस्थानातील सायकल बनविणारी पहिली कंपनी आहे ‘हिरो सायकल’. 1956 साली ही कंपनी पंजाबमधील लुधियाना येथे सुरू झाली. जगातील सायकल बनविणारी ही मोठी कंपनी समजली जाते. दिवसाला 18,390 सायकली ही कंपनी बनविते.