सीमेवर घुसखोरी करणारा दहशतवादी ठार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषा ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा लष्कराने खात्मा केला, तर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश आले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, पूंछमधील शाहपूर नियंत्रण रेषेजवळ काही जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. हे दहशतावादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यातील दोन दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले. लष्कराने शोधमोहीम राबवून दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडले तर चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.