
सोशल मीडियावर पसरणाऱ्या अश्लिलतेवर आता लगाम बसणार आहे. मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामसठी ‘टेक इट डाऊन’ हे टूल लॉन्च केले आहे त्याच्या मदतीने अश्लिलतेवर आळा बसणार आहे.
‘टेक इट डाऊन’ या नव्या टूलच्या मदतीने पूर्वी अपलोड केलेले फोटोही सोशल मीडियावरून हटवून ते व्हायरल होण्यापासून रोखता येणार आहे. अलिकडे सोशल मिडीयावर अश्लिल फोटो वेगाने व्हायरल होत असल्याचे दिसत आहे आणि अनेकदा त्याचाच फायदा घेऊन ब्लॅकमेलिंग सारख्या घटान घडल्या जातात. हिंदुस्थानात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यात 18 वर्षाखालील मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मुलं सोशल मीडियाचा वापर खूप करत असतात. ती लगेच कोणाच्याही जाळ्यात अडकली जातात आणि त्यानंतर त्यांचा फायदा घेतला जातो. मात्र आता यावर लगाम बसणार आहे.
‘टेक इट डाऊन’ टूलच्या मदतीने यूजर्स एखाद्या फोटोबाबत रिपोर्ट करतो त्यावेळी त्या फोटोचे एक डिजिटल फिंगरप्रिंट बनतं त्याला हॅशेस म्हंटले जाते. एक प्रकारचा तो फोटो कोडमध्ये बदलून जातो आणि मग त्या फोटोला कोणीही व्यक्ती पाहू शकत नाही. या टूलचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा फोटोला रिपोर्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तशाप्रकारचे जेवढे फोटो असतील ते कोणतेचे फोटो ओपन होणार नाहीत. म्हणजे ते फोटो ब्लॉक होणार. शिवाय एखादा व्यक्ती तो फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. मेटाने सांगितले की, या टूलला हिंदीत या वर्षाच्या शेवटपर्यंत हिंदुस्थानात लॉन्च केले जाईल आणि येत्या काळात क्षेत्रीय भाषेतही ते पाहायला मिळेल.
ही आहे समस्या
या टूलमध्ये एक अडथळा आहे की, जर कोणी व्यक्ती एखादा अश्लील फोटो सेव्ह करून एडिट करून फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करतो तर त्या परिस्थितीत तो फोटो ब्लॉक करता येऊ शकत नाही. कारण ते टूल त्या फोटोला नवीन समजतं. आणि आयडेंटिफाय करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या फोटोला पुन्हा रिपोर्ट करावे लागेल तेव्हा तो व्हायरल होऊ शकत नाही.























































