रात्रीचे उरलेले पदार्थ पुन्हा ताजे करून खा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1) शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा.

2) शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा पोळीचा कुस्करा करू शकता.

3) तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा.

4) दिवाळीला उरलेल्या चकली, शेव आणि चिवडा संपविण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालिपीठ बनवा.

5) बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर सॅंडविज,पराठा, पॅटिस, टिक्कीसाठी वापरता येतात.
डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील.

6) पोळ्यांची कणीक, थालिपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांची कणीक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता. ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ होतात.