जालना – मंदीर नुतनीकरणाच्यावेळी कळस जेसीबीवर पडल्याने चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना तालुक्यातील मानेगाव खालसा येथे मारुतीचे जुने मंदीर पाडताना मंदीराचा कळस जेसीबीवर पडल्याने जेसीबी चालक प्रकाश भगवान जाधव (37) यांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना 15 एप्रिल रोजी सकाळी १०च्या सुमारास घडली. यावेळी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मानेगाव खालसा येथे मारुतीचे पुरातन मंदीर आहे. ते मंदीर पाडून त्याचे नुतनीकरण करण्यात येणार होते. त्यामुळे जुने मंदीर पाडण्यासाठी प्रकाश भगवान जाधव हे त्यांचे जेसीबी घेऊन सकाळी 8 वाजता मंदीराजवळ गेले होते. या मंदीराचे काम सुरु असतांना सकाळी 10च्या सुमारास काळाने घाला घातला आणि मंदिराचा कळस थेट जेसीबीवरच कोसळला. कळस कोसळल्याने जेसीबीचा चेंदामेंदा झाला असून त्यात दबून प्रकाश भगवान जाधव यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. जेसीबी चालकाला एक चार वर्षाचा मुलगा असून दिड वर्षाची मुलगी आहे.