
पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डिंगच्या आडोशाला थांबणे सहा जणांच्या जिवावर बेतले आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे येथे होर्डिंग अंगावर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. किवळे देहूरोड परिसरात नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डिंगच्या आडोशाला थांबले होते. त्यावेळी वाऱ्यामुळे होर्डींग नागरिकांच्या अंगावर कोसळले. या दुर्दैवी घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला. सहा क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

























































