‘पुश इंडिया पुश क्रीडा महोत्सव’ तिसऱया दिवसअखेर अमरजीत, शोभीतची आघाडी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवात सोमवारी (दि. 17) तिसऱया दिवशीही कोणालाच ‘पुल अप्स’चे द्विशतक गाठता आले नाही. अमरजीत मित्रा (206) व शोभीत गुप्ता (203) हे दोन खेळाडू पहिल्या दिवशी द्विशतकी पुल अप्सचे मानकरी ठरले. या दोघांनी तिसऱया दिवसअखेरपर्यंत अनुक्रमे पहिले दोन क्रमांक टिकवून ठेवले. अमन घोष हा 178 ‘पुल अप्स’ मारून सध्या तिसऱया स्थानावर आहे.

आदर्श सोमाणी यांनी आपले वडील राजेंद्र सोमाणी यांच्या स्मरणार्थ पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साही आणि देखण्या वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे. 1 कोटी 15 लाख रुपयांची घसघशीत बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत दहाव्या स्थानी राहणाऱया स्पर्धकालाही 75 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान बक्षीस रक्कम हे या स्पर्धेचे खास वैशिष्टय़ होय. त्यामुळे टॉप-10मध्ये स्थान मिळविण्यासाठी स्पर्धेत कौशल्य पणाला लावताना दिसत आहे. पुरुषांमध्ये दोन स्पर्धकांनी दोनशेहून अधिक ‘पुश अप्स’ मारून उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले आहे. मात्र महिला गटात तिसऱया दिवशीही कोणाला शंभर ‘पुश अप्स’चा आकडा पार करता आलेला नाही.