
वृद्धाच्या नावे असलेल्या केडगाव येथील तीन प्लॉटचे परस्पर गहाण खत करून त्यावर नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेतून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जयंत वाघ (वय 75, रा. गुलमोहर रोड, सावेडी) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य रघुनाथ कुलकर्णी, रामदास औताडे (रा. केडगाव), महादेव लांडगे (रा. परभणी), मच्छिंद्र पठारे (रा. केडगाव) यांच्यासह तत्कालीन शाखाधिकारी आनंद विजय बडवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वाघ यांनी सन 1970 साली केडगाव येथे जमीन खरेदी केली होती. त्यांनी जमिनीचे एन ए करून त्याचे प्लॉट पाडले होते. दि. 15 नोव्हेंबर 2019 रोजी वाघ यांना अर्बन बँकेची नोटीस आली. त्यात अर्जदार व इतर लोक जामीनदार असून व मंत्रा प्रिंटर्स प्रोप्रा. चैतन्य कुलकर्णी यांनी सुमारे तीन कोटी रुपये कर्ज घेतलेले असून, त्याचे हफ्ते थकीत केल्याचे नमूद केलेले होते. वाघ यांनी नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेत जावून सदर बाबत खात्री केली.
त्यावेळी मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य कुलकर्णी याने वाघ यांच्या ऐवजी कोणीतरी बोगस व्यक्ती उभा करून वाघ यांच्या मालकीच्या केडगाव येथील प्लॉट मिळकतीचे गहाण खत सह दुय्यम निबंधक वर्ग दोन (पराग बिल्डिंग नगर) येथे नोंद केली. त्यानंतर वाघ यांची मिळकत अर्बन बँकेच्या केडगाव शाखा येथे गहाण ठेवून बँकेकडून तीन कोटी रुपये कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले.
सदरचा प्रकार वाघ यांच्या लक्षात येताच त्यांनी सहजिल्हा निबंधक वर्ग एक यांच्याकडे तक्रार केली. तेथे वेळोवेळी चौकशी होऊन वाघ यांच्या बाजूने निकाल लागला आहे. तसेच, गहाण खत दस्तात दि. 6 जुलै, 2019 नगर अर्बन बँक यांनी मंत्रा प्रिंटरचे चैतन्य कुलकर्णी यांना कर्ज मंजूर केले. त्यामध्ये नजर गहाण कर्ज रक्कम रुपये एक कोटी, खेळत्या भांडवलासाठी दोन कोटी रुपये असे स्थावर मालमत्तेवर तीन कोटी रुपये रजिस्टर तारण गहाण खत करून दिले. यामध्ये जामीनदार मच्छिंद्र पठारे, रामदास औताडे, महादेव लांडगे, जयंत वाघ यांच्या वैयक्तिक जामीनकीवर त्यांना कर्ज दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
त्याप्रमाणे सहजिल्हा निबंधक अधिकारी यांनी चैतन्य कुलकर्णी व त्यांना साहाय्य केलेल्या व अर्जदाराच्या जागी उभा केलेल्या बोगस व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे नगर अर्बन बँकेस आदेश दिले. पंरतु अद्यापपर्यंत बँकेने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने वाघ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फीडर बसविले आहेत. मात्र, एक्स्प्रेस फीडरवरील वीजपुरवठा मंगळवारी खंडित होतो. याचा परिणाम बुधवारच्या पाणीपुरवठय़ावर होतो. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे ऑडिट करावे, अशी मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली.

























































