
>>दुष्यंत पाटील
बीथोव्हनची ‘टर्किश मार्च’ ही रचना संगीताच्या इतिहासात अजरामर झाली. कित्येक मोठमोठय़ा संगीतकारांनी या रचनेच्या इतर वाद्यांसाठी अॅरेंजमेंट्स केल्या. बीथोव्हनची ही रचना आजही अतिशय आवडीनं ऐकली जाते. ‘टर्किश मार्च’मधली विशिष्ट प्रकारची लय, मनाची पकड घेणारी चाल अनुभवण्यासाठी आपण एकदा तरी बीथोव्हनचा ‘टर्किश मार्च’ ऐकायलाच हवा!
तुर्कस्तानच्या सुलतानाच्या सैन्यातले काही खास सैनिक ‘जानसरी’ अशा नावानं ओळखले जायचे. त्यांचा दर्जा अतिशय उच्च समजला जायचा. सुलतानाची वैयक्तिक सुरक्षा करणाऱया लोकांमध्ये हे जानसरी लोकच असायचे. प्रचंड शिस्त आणि निष्ठा हे त्यांचं वैशिष्टय़ होतं.
या जानसरी सैनिकांचं मिलिटरी संगीत उठावदार असायचं. यात शक्तीचा संचार करायला लावणारी अशी तालवाद्यं असायची, अगदी वरच्या पट्टीत वाजणारी फुंकून वाजवण्याची वाद्ये (सुषीर वाद्ये) असायची. खरं तर या संगीतात तऱहेतऱहेची वाद्यं वापरली जायची. युद्धप्रसंगी शत्रूच्या छातीत धडकी भरवणारं, तर स्वतच्या सैन्याला शक्ती देणारं हे संगीत असायचं, पण हे संगीत फक्त युद्धप्रसंगीच वाजवलं जायचं असं नव्हतं. शांतीच्या काळातही हे संगीत वाजवलं जायचं.
या तुर्कस्तानी लोकांचं इतर काही युरोपियन देशांशी (ऑस्ट्रिया, पोलंड, रशिया वगैरे) सतराव्या शतकाच्या शेवटी शेवटी युद्ध सुरू झालं. हे युद्ध 1683 पासून 1699 पर्यंत चालू होतं. शेवटी 1699 मध्ये तह झाला आणि शेवटी हे युद्ध संपलं. या तहानंतर तुर्कस्तानी मुत्सद्दी मंडळींसोबत ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात जानसरी बँड (वादकांचा ग्रुप) आला. व्हिएन्ना म्हणजे एक प्रकारे युरोपमधली सांस्कृतिक राजधानीच होती. तसं युरोपमधल्या मंडळींना तुर्कस्तानी लोकांच्या मिलिटरी संगीताचा परिचय होताच, पण आता या बँडमुळं हे संगीत युरोपमध्ये जास्त पसरायला लागलं.
अठराव्या शतकात युरोपमध्ये बऱयाच ठिकाणी सैन्याच्या संगीतावर या संगीताची छाप पडायला लागली. काही ठिकाणी युरोपच्या अभिजात संगीतातही (Classical Music) हे संगीत यायला लागलं. युरोपियन लोकांच्या दृष्टीनं या संगीताची दोन खास वैशिष्टय़ं होती. एकतर हे संगीत मिलिटरी संगीत होतं आणि दुसरं म्हणजे हे संगीत त्यांच्या दृष्टीनं पौर्वात्य संगीत होतं. संगीताच्या क्लासिकल कालखंडातल्या मोत्झार्ट, हेडन आणि बीथोव्हन या दिग्गज संगीतकारांनाही या प्रकारातलं संगीत रचण्याचा मोह आवरला नाही. या तिघांचंही कधी ना कधी व्हिएन्नामध्ये वास्तव्य होतंच.
या प्रकारात केली गेलेली बीथोव्हनची एक अजरामर रचना म्हणजे ‘टर्किश मार्च’. बीथोव्हननं 1809 च्या दरम्यान ‘थीम अँड व्हेरिएशन्स’ प्रकारात मोडणारं संगीत रचलं. यातली थीम तुर्कस्तानी मिलिटरी संगीताची आठवण करून देणारी होती. हे संगीत फक्त पियानोवर वाजवण्यासाठी रचलं होतं.
यानंतर दोनच वर्षांनी बीथोव्हनला एका नाटकासाठी संगीत रचण्याचा योग्य आला. या नाटकाचं नाव होतं ‘ऊप Rल्ग्हे द Atपहे’. हंगेरीमधल्या बुडापेस्ट नावाच्या ठिकाणी एक नवीन नाटय़गृह उभारण्यात आलं होतं. या नाटय़गृहात ऊप Rल्ग्हे द Atपहेच्या प्रयोगानंच नाटकांची सुरूवात होणार होती. 1808 मध्ये सम्राट फ्रँझ याच्या आदेशानंच या नाटय़गृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. हा सम्राट ऑस्ट्रियन होता आणि त्याच्या साम्राज्यात येणाऱया हंगेरीतल्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी त्यानं हे नाटय़गृह बांधलं होतं.
ऊप Rल्ग्हे द Atपहे मध्ये अॅथेना नावाची ग्रीक देवी एका सहस्रकाच्या निद्रेनंतर जागी होते. तुर्कस्तानच्या लोकांनी आाढमण केल्यानं अॅथेन्सची झालेली दुर्दशा तिला दिसते आणि ती हंगेरीमध्ये येण्याचा निर्णय घेते असं काहीतरी त्या नाटकाच्या कथानकात येत होतं. हंगेरीतले लोक पूर्वीपासूनच तुर्क लोकांना आपले शत्रू मानत होते. हे सारं कथानकही हंगेरीतल्या लोकांना ऑस्ट्रियन सम्राटाबद्दल आत्मीयता वाटावी या उद्देशानं लिहिलं होतं.
या नाटकात तुर्कस्तानी सैन्याचं संगीत येत होतं. बीथोव्हननं या प्रसंगासाठी दोन वर्षांपूर्वी रचलेलंच संगीत वापरलं. हे संगीत म्हणजे बीथोव्हनचा एक मास्टरपीसच होता. हे संगीत ऐकताना सैन्याची तुकडी दुरून जवळ येत आहे आणि जवळ आल्यानंतर पुन्हा दूर जात असल्याचा भास होत होता. याचं कारण म्हणजे या रचनेत सुरुवातीला मंद आवाजातलं संगीत येत होतं, तर नंतर हाच आवाज वाढत जाऊन शेवटी कमी कमी होत होता.
बीथोव्हनची ‘टर्किश मार्च’ ही रचना संगीताच्या इतिहासात अजरामर झाली. कित्येक मोठमोठय़ा संगीतकारांनी या रचनेच्या इतर वाद्यांसाठी अॅरेंजमेंट्स केल्या. बीथोव्हनची ही रचना आजही अतिशय आवडीनं ऐकली जाते. ‘टर्किश मार्च’मधली विशिष्ट प्रकारची लय, मनाची पकड घेणारी चाल अनुभवण्यासाठी आपण एकदा तरी बीथोव्हनचा ‘टर्किश मार्च’ ऐकायलाच हवा!





























































