तोपर्यंत बैठकीस उपस्थित राहणार नाही! बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना मागणीवर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसू येथील रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलकांविरोधात काढलेल्या तडीपारी नोटीस रद्द केल्याशिवाय बैठकीस उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका रिफायनरी विरोधी संघटनेचे नरेंद्र जोशी यांनी एका पत्रकाद्वारे कळवली आहे.

आज देखील विरोधी संघटनेचे आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी देखील बारसू येथील सड्यावर ग्रामस्थ भर उन्हात आंदोलन करत आहेत. शांततेत सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान, प्रशासनामार्फत माती परीक्षणसाठी ड्रिलिंग सुरू आहे.

आज दुपारी 4:30 वाजता राजापूरच्या उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रशासनामार्फत बैठकीच्या आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. प्रशासनामार्फत सकारात्मक भूमिका घेऊन स्थानिकांशी चर्चा करून पुढील धोरणे ठरविण्यात येणार आहेत, असं सांगण्यात येत आहे.

परंतु रिफायनरी विरोधी संघटनेचे नरेंद्र जोशी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या पत्रकात त्यांनी जोपर्यंत संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर असलेले तडीपारचे नोटीस जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चेला बसणार नाही. कारण प्रशासन नेमकी चर्चा कुणाशी करणार हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमचे कार्यकर्ते पदाधिकारी जर चर्चेला नसतील तर प्रशासन कोणाशी चर्चा करणार आहे ते देखील प्रशासनाने कळवावे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मिळाल्या माहितीनुसार संध्याकाळच्या चर्चासत्रासाठी रिफायनरी विरोधी संघटनेमार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.