उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत सपत्नीक साई दर्शनाला हजेरी लावली. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती संपन्न झाली. त्यांनी साईसमाधीवर भगव्या रंगाची शाल अर्पण केली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साईबाबांची शाल व साई मूर्ती देत सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, बबनराव घोलप संपर्कप्रमुख , माजी विश्वस्त सचिन कोते, माजी विश्वस्त अविनाश दंडवते, संजय शिंदे , सुनील परदेशी , स्वाती परदेशी , रवी शिंदे , मुकुंद सिनगर , सुहास वहाडणे , गणेश सोमवंशी , नाना बावके ,भागवत लांडगे , राजेंद्र पठारे ,आदी उपस्थित होते.

शिवसैनिकांकडून दणक्यात स्वागत

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जयघोषात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केले. शिर्डी, राहाता ,कोपरगाव, संभाजीनगर, श्रीरामपूर ,संगमनेर, असा असंख्य ठिकाणावरून कट्टर शिवसैनिक शिर्डीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीस आले होते. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होती.