
पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी, हातभट्टीचे तब्बल ८४ दारुअड्डे उद्धवस्त करीत उत्पादन शुल्कच्या विभागाने 47 आरोपींना अटक केली. तर, 30 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील केवळ दहा दिवसात विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली आाहे.
शहरालगतच्या उपनगरांमध्ये गावठी दारूचे अड्डे चालविले जातात. अशाठिकाणी पोलिसांनी कारवाई केली तरी काही दिवसात हे अडड्े पुन्हा सुरू होतात. लोणी काळभोर, लोणींकदसह जिल्ह्यातील पुरंदर, जून्नसह अनेक ठिकाणी ग्रामिण भागात असे दारू अडड्े आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईसाठी विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली होती. या पथकाने 4 ते 12 मे या कालावधीत शहरासह जिल्ह्याच्या विविध भाागात सुरू असलेले 84 गावठी दारू अड्डे उद्धवस्त केले. 68 वारस गुन्ह्यांची नोंद करीत 47 आरोपींना अटक केली आहे. उत्पादन शुल्क पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांनी स्वतः काही कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेत कारवाई केली. यामुळे अवैधरित्या गावठी दारू अड्डे चालविणार्यांचे धाबे दणाणले आहेत. उत्पादन शुल्कच्या पथकाने या कारवाईदरम्यान दहा वाहने देखील जप्त केली आहेत. यापुढे देखील भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई सुरू राहणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उपअधिक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
हातभट्टी व्यावसायिक स्थानबद्ध
हातभट्टी निर्मिती व त्याची विक्री करणार्या एकूण 32 आरोपींवर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यातील हातभट्टी व्यावसाय करणार्या रमेश ईमजी चव्हाण (41, रा. येरवडा) याच्यावर एम.पी.डी.ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.





























































