दोन फेरे घेतल्यानंतर नववधूने लग्न करण्यास दिला नकार, कारण वाचून वाटेल आश्चर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. चार महिन्यांपूर्वी एका तरुणीचे लग्न ठरले होते. लग्नाचा दिवस आला, मंडप सजला, पाहुण्यांनी हजेरी लावली, मंत्रपठण करत विधी झाले आणि दोन फेरेही घेतले. अशातच अचानक नववधूने लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाने तिला असे करण्याचे कारण विचारल्यावर तिने धक्कादायक उत्तर दिले.

लग्न मध्येच थांबविल्याने नववधूच्या कुटुंबियांनी तिला समजावले. मात्र, नववधू कोणाचे ऐकायला तयारच नव्हती. अखेर नवरदेव वरात घेऊन परत घरी गेला. ही घटना सोनवर्षा परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणीचे लग्न परिसरातीलच एका तरुणाशी ठरला होता. 17 मे ला वरात आली आणि वरात्यांचे स्वागत करण्यात आले. पूर्ण रितीरिवाजानुसार त्यांनी एकमेकांना हार घातले मात्र सातफेरे घेत असताना दुसऱ्याच फेरीत तिने लग्न करणार नसल्याचे सांगितले. नातेवाईकांनी वारंवार समजवूनही तिने नकार दिला. नवरदेवासोबत दोन फेरे घेतले. मात्र त्यानंतर साहस करुन तिने लग्नाला नकार दिला आणि सर्वांना सांगितले की, मी हे लग्न करणार नाही.

नववधूने सांगितले, तो काळा आहे त्यासाठी मी लग्न करणार नाही. असं बोलल्यावर मंडपात स्मशान शांतता पसरली. नववधूने असे बोलल्यावर दोन्ही पक्षाच्या लोकांना आश्चर्य वाटले. दरम्यान तिला अनेकांनी समजविण्याचा प्रयत्न केला मात्र ती कोणाचेच ऐकले नाही. तिथे तिच्या घरच्यांना नवरदेवाकडील लोकं हंगामा करु नयेत याच्या चिंतेत होते. त्यासाठी त्यांनी नवरदेवाकडील काही लोकांना बंधक बनवले. मात्र तासनतास समजावूनही ती एकली नाही. अखेर भेट म्हणून देण्यात आलेले पैसे आणि सामान परत मागून घेतले.

प्रकरण वाढल्याचे लक्षात येताच एकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी आणि सह स्टेशनप्रभारी सुचित्रा कुमारीने दोन्ही पक्षांना पोलीस स्थानकात बोलावले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर हे प्रकरण शातं करण्याचा प्रयत्न केला.

तर नवरदेवाचे वडिल भावूक होऊन बोलले की, चार महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. त्यावेळी आठवले नाही का? अचानक असे का झाले? बोलले जात आहे की, नववधूचे प्रेमप्रकरण असल्याने तिने हे लग्न मोडले आहे. नववधूकडील लोकांनी ओलीस ठेवले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना समजावले. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ता विरेंद्र कुमार यादवने सांगितले की, सगळं काही आलबेल होते, पण सात फेरे घेत असताना नववधूने लग्न करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी हस्तशेप केल्यानंतर प्रकरण शांत केले,.