
हे कशाही बाबतीत बोलणार, पण यांच्याविषयी कोणीही बोलायचंच नाही का ? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला केला.
नाशिक येथे शनिवारी राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर मी दिलेली प्रतिक्रिया त्यांनी समजून घ्यायला हवी, असे भाजपचे नाव न घेता ते म्हणाले. त्यांच्याविषयी इतरांनी कोणी प्रतिक्रियाच देऊ नये असं त्यांचं म्हणणं असेल तर उद्या वर्तमानपत्रांनी अग्रलेखही लिहायला नको. म्हणजे यांच्याबाबतीत कोणीच काही बोलायचं नाही का? हे मात्र कशाही बाबतीत बोलणार, असेही राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले. नोटाबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही. आता तुम्ही नवीन नोट आणणार, असे सांगून ते म्हणाले अशाने देश चालणार आहे का?
त्यांना दंगली हव्यात का?
संदलवेळी देवाला धूप दाखविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा असेल तर ती थांबवण्यात अर्थ नाही. हा विषय त्र्यंबकेश्वरमधील गावकरी आणि विश्वस्तांचा आहे. महाराष्ट्रात अनेक मंदिर, मस्जिदीमध्ये हिंदू-मुस्लिम सख्य आहे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्याइतका आपला धर्म कमकुवत आहे का? या विषयात बाहेरच्यांनी पडू नये. हिंदू-मुस्लिम सामंजस्य बिघडवू नये, असे त्यांनी याविषयी वाद निर्माण करणाऱयांना खडसावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची शनिवारी जपानमधील हिरोशिमा येथे जी-7 शिखर परिषदेत भेट झाली. रशिया आणि युव्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना ही बैठक झाल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युव्रेन युद्ध हा केवळ राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मुद्दा नसून मानवतेचा मुद्दा आहे, असे मोदी म्हणाले.





























































