एका चार्जवर 140 किलोमीटरची रेंज, ई-स्प्रिंटोची हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर अमेरी लॉंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड, ई-स्प्रिंटोने आपल्या अशा बहुप्रतीक्षित ईव्ही टू-व्हीलर अमेरीचे लाँचिंग केले आहे. या ब्रँडच्या लाइनअपमध्ये सामील होणारी ही दुसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. रिमोट कंट्रोल लॉक, चोरीविरोधी अलार्म, मोबाइल चार्जिंग सॉकेट, फाईंड माय व्हेईकल यासह सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आणि एकाच चार्जवर 140 किलोमीटरची प्रभावशाली श्रेणी असलेले हे मॉडेल, 20 ते 35 वयोगटातील युनिसेक्स शहरी रायडर्सना लक्ष्य करून निर्माण करण्यात आले आहे.

अमेरीचे नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च अभियांत्रिकी बाबी तिच्या वैशिष्ट्यांमध्ये स्पष्ट आहेत. 200 मि.मी.च्या अपवादात्मक ग्राउंड क्लिअरन्स आणि 98 किलो वजनाच्या कर्ब वेटसह अमेरी एक रोमांचक राईडचे वचन देते. ज्यात आराम आणि गती यांना सहजपणे एकत्र आणले जाते. 1500 वॅट बीएलडीसी हब मोटर, 2500 वॅटची पीक पॉवर प्रदान करते. ज्यामुळे या स्कूटरला फक्त 6 सेकंदात प्रति तास 0 ते 40 किलोमीटरपर्यंत जाण्यास शक्ती मिळून, ती 65 कि.मी./तास एवढी उच्च गती गाठते. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक यांच्यामुळे इष्टतम नियंत्रण आणि सुरक्षिततेची हमी प्राप्त होते, तर 140 कि.मी. कमाल श्रेणीमुळे लांब अंतराचा प्रवास सहजतेने पार पाडला जातो. ब्लिसफुल व्हाईट, स्टर्डी ब्लॅक (मॅट) आणि हाय स्पिरीट यलो या तीन आश्चर्यकारक रंगांमध्ये उपलब्ध असलेली अमेरी अधिकृत ई-स्प्रिंटो डीलरशिप आणि देशभरातील शोरूममधून 1 लाख 29 हजार 999 रुपयांच्या एक्स – शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.

ई-स्प्रिंटोचे संस्थापक आणि संचालक अतुल गुप्ता म्हणाले की, “आम्ही आमच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ई-स्प्रिंटोची अमेरी सादर करण्यास उत्सुक आहोत. अमेरी ही नावीन्यपूर्णतेच्या सीमा पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि शहरी वाहतुकीचे एक रोमांचक परंतु पर्यावरण-सजग साधन प्रदान करण्याच्या आमच्या अटूट वचनबद्धतेचा एक दाखला आहे. तिचा प्रभावशाली वेग, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि मनमोहक सौंदर्यशास्त्र एकत्रितपणे राइडिंगचा एक अनुभव अतुलनीय निर्माण करतात. अमेरीसह, आम्ही फक्त आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटरचा शुभारंभ करत नाही, तर आम्ही शहरी गतिशीलतेचा एक नवीन नमुना सादर करत आहोत.”