
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ला या त्रिमाहीत चांगला नफा झाला आहे. एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्याने अनेक गुंतवणूकदार धास्तावले होते. मात्र, आता एसआयसीच्या नफ्यात वाढ झाल्याने गुतंवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी आर्थिक निकालांना मान्यता दिली आणि ते स्वीकारले.
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी4,74,005 कोटी एकूण प्रीमियम उत्पन्नात 10.90% वाढ नोंदवली आहे. फर्स्ट इयर प्रीमियम इन्कमद्वारे मार्केट शेअरच्या संदर्भात 62.58% वाढीसह शेअरची कामगिरी आहे. तसेच IRDAI नुसार उत्पन्न 16.67% ने वाढले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1.98 लाख कोटी ते आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2.32 लाख कोटी झाले आहे.
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी करानंतरचा नफा 36,397.40 कोटी आहे. तो 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या मागील वर्षात 4,043.12 कोटी होता. गेल्या वर्षांच्या तुलनेत त्यात तब्बल 27,240.75 कोटींची वाढ झाली आहे. तसेच संचालक मंडळाने प्रति शेअर 3 रुपये लाभांशाची शिफारस केली आहे आणि लाभांश पेआउट 1,897 कोटी रुपये आहे. वार्षिक प्रीमियम समतुल्य एकूण प्रीमियम 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षात 56,682 कोटी रुपये आहे. त्यात12.49% वाढ झाली आहे.
याबाबत एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, आमचे निकाल सहा दशकांहून अधिक कालावधीत, देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेल्या आमच्या व्यवसायाची लवचिकता दर्शवतात. एकूण उत्पादनांच्या मिश्रणात नॉन-पार उत्पादनांचा वाटा वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना फळ मिळत आहे. नफ्यात वाढ, निव्वळ VNB मार्जिन आणि IEV सह आम्ही आमच्या विकासाचा प्रवास, देशाच्या आणि तेथील नागरिकांच्या सेवेत सुरू ठेवण्यासाठी योग्य स्थितीत आहोत. 2047 पर्यंत सर्वांसाठी विम्याच्या दिशेने नियामक उपक्रम या क्षेत्रासाठी वाढीच्या संधी उपलब्ध करून देतील आणि त्या वाढीत सहभागी होण्याचा आमचा मानस आहे. आमचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आम्ही पुढे जात असताना, आम्ही आमच्या सर्व भागधारकांसाठी उत्कृष्ट मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आम्ही आमच्या सर्व पॉलिसीधारक, एजंट, कर्मचारी आणि भागधारकांचे त्यांनी आमच्यावरील विश्वास कायम ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.



























































