कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापुरात ‘ऍण्टिकरप्शन’ची कारवाई, लाचखोरांना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सेवानिवृत्तीनंतर रजारोखीकरण प्रस्ताव विनात्रुटी मंजूर करण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे (वय 50, सध्या रा. प्लॉट नं. 4, सुनंदा पार्क, कोल्हापूर; मूळ रा. कासारपुतळे, ता. राधानगरी) याच्यासह हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पारगाव येथील चालक विलास जीवन शिंदे (वय 57) आणि खासगी व्यक्ती शिवम विलास शिंदे (वय 22, दोघे रा. सरकारी हॉस्पिटल कॉलनी, पारगाव; मूळ रा. किणी, ता. हातकणंगले) या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

सेवानिवृत्तीनंतर रजारोखीकरण प्रस्ताव विनात्रुटी मंजूर करतो म्हणून सहायक अधीक्षक मारुती वरुटे यांनी तक्रारदाराकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार चालक विलास शिंदे याला घेण्यास सांगितले. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून खात्री केली. आज विलास शिंदे आणि शिवम शिंदे या दोघांना लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.