
बिहारमध्ये अगुवानी-सुलतनगंजदरम्यान गंगा नदीवर उभारण्यात येणाऱया पुलाचा मोठा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. तब्बल 192 मीटर पुलाबरोबरच चार पिलर कोसळून नदीत पडल्याने जवळपास 50 फूट उंचीच्या लाटा उसळल्या. पुलाच्या कोसळलेल्या भागापासून पाचशे फूट लांब कर्मचारी काम करत होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, वर्षभरात दुसऱयांदा पूल कोसळण्याची घटना घडली आहे.
गंगा नदीवर 3.16 किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या उभारणीचे काम 2015 पासून सुरू आहे. एस. पी. सिंगला ही पंपनी पूल उभारत असून त्यावर सुमारे 1700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. पुलाचा मोठा भाग गंगा नदीच्या पाण्यात कोसळ्याने उसळलेल्या लाटांमुळे बाजूने जाणाऱया बोटीतील प्रवासी पाण्यात पडले.
























































