
नार्वेच्या कॅस्पर रूडला फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. महिला एकेरीत टय़ुनिशियाच्या वन्स जबूर हिने सहज विजय मिळवत आपली घोडदौड कायम ठेवली.
चतुर्थ मानांकित कॅस्पर रूडला चौथ्या फेरीत चिलीच्या निकोलस जॅरीने 7-6 (7/3), 7-5, 7-5 असे झुंजविले. पहिलाच सेट ट्रायब्रेकपर्यंत ताणला. हा सेट जिंकल्यावर रूडला दुसऱया व तिसऱया फेरीतही विजयासाठी झगडावे लागले. ही लढत 3 तास 20 मिनिटांपर्यंत रंगली. महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत सातव्या मानांकित वन्स जबूर हिने अमेरिकेच्या बर्नार्डा पेरा हिचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करत आगेकूच केली. ही लढत एक तास तीन मिनिटांपर्यंत चालली.
बॉल गर्लला चेंडू लागल्याने खेळाडू अपात्र
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सामन्यादरम्यानच जपान- इंडोनेशियाच्या महिला दुहेरी जोडीला अपात्र ठरवण्यात आले. जपानची मियू काटो हिचा एक फटका बेसावध बॉल गर्लच्या डोक्याला लागला. यानंतर बॉल गर्ल जवळपास 15 मिनिटे रडत होती. अखेर पंचांनी जपान-इंडोनेशियाच्या जोडीला स्पर्धेतून अपात्र ठरवले. आधी पंच, काटो व तिची जोडीदार यांच्यात दीर्घ चर्चा झाली. यानंतर पंचांनी कोटो आणि तिच्या जोडीदाराला अपात्र ठरवले. यानंतर संपूर्ण मैदान अवाक झाले.
दुसरीकडे विरोधी जोडी बूजकोवाने सांगितले की, ही सर्वांसाठीच एक वाईट स्थिती होती. मात्र हा निर्णय नियमांनुसार झाला. हे खूप दुर्दैवी आहे. हा पंचांचा निर्णय होता. बूतकोवाने सांगितले की, मी चेंडू बॉलगर्लला लागल्याचे पाहिले नाही. मात्र, ती 15 मिनिटे रडत होती. ज्यावेळी बॉलगर्ल रडत होती त्यावेळी विरोधी खेळाडू बूजकोवो आणि सोरिबेस या दोघीही हसत होत्या. सोशल मीडियावर यामुळे खूप ट्रोलिंग सुरू झाले. जपानची काटो आणि इंडोनेशियाची जोडीदार एल्डिला सुत्जियादी महिला दुहेरीच्या तिसऱया राऊंडमध्ये बुजकोवा आणि सारा सोरिबेस टॉर्मो सोबतच्या सामन्यात 7- 6(1), (1-3) अशी आघाडीवर होती.























































