नाट्यगृहातील त्रुटी आणि समस्या सोडवा, रंगकर्मींची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहातील समस्या आणि त्रुटींबाबतचे निवेदन रत्नागिरीतील रंगकर्मीनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. या त्रुटींवर लवकरात लवकर तोडगा काढावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

रंगकर्मीनी दिलेल्या या निवेदनामध्ये नाट्यगृहाचा नामफलक योग्य जागी व लोकांच्या नजरेत येईल अशा ठिकाणी लावावा. नाट्यगृहाच्या समोरील भागात नाटकाचे फलक लावण्याकरीता एक निश्चित जागा आणि आकार ठरवून द्यावा. नाट्यगृहाच्या समोरील रस्त्यावर होणाऱ्या इतर गाड्यांच्या पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी आणि नाट्यगृहासमोरील रस्ता केवळ नाट्यगृहाच्या वापराकरीताच उपलब्ध ठेवावा. नाट्यगृहाच्या वॉचमनकरीता गेटवर एक खोली बांधून द्यावी. तिथेच वॉचमनला बसण्याची व्यवस्था करून द्यावी. फक्त प्रयोग असताना किंवा साफसफाई व डागडुजी करीता नाट्यगृहाचे दरवाजे उघडण्यात यावे, अशी व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांची डागडुजी आणि स्वच्छता ठेवण्यात यावी. वीजेवर चालणारी नवीन वातानुकूलीत यंत्रणा बसवावी. रंगमंचावरील विंगाचे कापड बदलावे. विंग पुढेमागे करण्याकरीता ट्रॅकची लांबी रंगमंचाच्या दिशेने वाढवणे. शक्य तितके पडदे फ्रिल बार आणि लाईट बार हे स्वयंचलित बसवण्यात यावेत. पडद्याचे कापड बदलणे. रंगपटातील सर्व आरशांवरील बल्ब, खिडक्यांचे पडदे आणि वातानुकूलीत सेवा अद्यावत करणे तसेच अन्य काही समस्या या निवेदनात मांडल्या आहेत,