
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीबद्दल सांगितलं की, “प्रभारी पद म्हणजे काही दडपशाही नाही, राष्ट्रवादी हा लोकशाहीचा पक्ष आहे. आम्ही इथे सेवा करण्यासाठी आलो आहे.
यादरम्यान अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे. तसेच पक्षात कोण कोणाला रिपोर्ट करेल याबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे पक्षात कोण-कुठली जबाबदारी सांभाळेळ या विषयी बोलताना म्हणाल्या की, मी आणि प्रफुल्ल पटेल शरद पवार यांना रिपोर्ट करणार. तर छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार.
याठिकाणी रिपोर्टचा प्रश्न नसून प्रत्येकाची जबाबदारी असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मला दिलेली जबाबदारी मोठी असणार आहे. सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मला असेल. अजित पवार हे राज्यातील विरोधीपक्षनेते आहेत. विरोधीपक्षनेत्याचं पद हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचे असते असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

























































