अमित साधचा ‘मैं’…लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अमित साध लवकरच ‘मैं’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘मैं’ हा एक कॉप ड्रामा आहे. त्यातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. ते नुकतेच पूर्ण झाले आहे.

अमितने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘मैं’च्या सेटवरील काही खास पह्टो शेअर केलेत. सीमा बिस्वास, ईशा देओल, तिग्मांशू धुलिया आणि मिलिंद गुणाजी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत अमित या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.

‘मैं’च्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. याव्यतिरिक्त अमितकडे अनेक धमाकेदार प्रोजेक्टस् आहेत. यामध्ये ‘घुसपैठ’, ‘पुणे हायवे’, ‘दुरंगा 2’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.