शाळा गजबजल्या; पहिल्या दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गुरुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. गुहागर तालुक्यात जि.प.शाळा भातगाव कोसबी मधील विद्यार्थ्यांना सजवलेल्या चारचाकी गाडीतून शाळेत आणण्यात आले.शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीमध्ये 10 हजार 952 नवीन विद्यार्थी दाखल झाले. त्यामध्ये 5 हजार 585 मुले आणि 5 हजार367 मुलींचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये 10 हजार 952 नवीन विद्यार्थ्यांनी आजपासून शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवायला प्रारंभ केला. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ४५१ विद्यार्थी त्यामध्ये २३३ मुले आणि २१८ मुलींचा समावेश आहे. दापोली तालुक्यात १ हजार ३९४ विद्यार्थी त्यामध्ये ७३० मुले आणि ६६४ मुलींचा समावेश आहे. खेड तालुक्यात १ हजार १८७ विद्यार्थी त्यामध्ये ५९४ मुले आणि ५९३ मुलींचा समावेश आहे. चिपळूण तालुक्यात १ हजार ७१३ विद्यार्थी त्यामध्ये ८४६ मुले आणि ८६७ मुलींचा समावेश आहे. गुहागर तालुक्यात ९४३ विद्यार्थी त्यामध्ये ४९१ मुले आणि ४५२ मुलींचा समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यात १ हजार २७३ विद्यार्थी त्यामध्ये ६५९ मुले आणि ६१४ मुलींचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात १ हजार ७५२ विद्यार्थी त्यामध्ये ८८७ मुले आणि ८६५ मुलींचा समावेश आहे. लांजा तालुक्यात ८११ विद्यार्थी त्यामध्ये ४११ मुले आणि ४०० मुलींचा समावेश आहे. राजापूर तालुक्यात १ हजार ०४१ विद्यार्थी त्यामध्ये ५५९ मुले आणि ४८२ मुलींचा समावेश आहे. नगर परिषद शाळांमध्ये ३८७ विद्यार्थी त्यामध्ये १७५ मुले आणि २९२ मुली यांचा समावेश आहे.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ३४१ विद्यार्थ्यांना ४ लाख ८३ हजार ९९७ पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. मंडणगड तालुक्यात ५ हजार ०१९ विद्यार्थ्यांना २० हजार ९०१ पुस्तके, दापोली तालुक्यात १२ हजार ३५४ विद्यार्थ्यांना ५२ हजार २५४ पुस्तके, खेडमध्ये १० हजार ८७६ विद्यार्थ्यांना ४५ हजार ०६२ पुस्तके, चिपळूण तालुक्यात १८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना ७७ हजार २४९ पुस्तके, गुहागर तालुक्यात ९ हजार ८५४ विद्यार्थ्यांना ४० हजार ९४० पुस्तके, संगमेश्वर तालुक्यात १३ हजार ३४५ विद्यार्थ्यांना ५५ हजार ५०३ पुस्तके, रत्नागिरी तालुक्यात २५ हजार १८६ विद्यार्थ्यांना १ लाख ५ हजार १७६ पुस्तके, लांजा तालुक्यात ८ हजार ६७० विद्यार्थ्यांना ३५ हजार ८४५ पुस्तके, राजापूर तालुक्यात १२ हजार २९१ विद्यार्थ्यांना ५१ हजार ०६७ पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

शून्य शिक्षकी शाळांवर कामगिरीचे गुरूजी
725 शिक्षकांची आतंरजिल्हा बदली झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १७५२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.रिक्त जागांमुळे १६१ शाळा शून्य शिक्षकी शाळा ठरल्या आहेत.ज्या शाळांमध्ये दोन किॅवा तीन शिक्षक आहेत त्या शाळांमधील शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांवर कामगिरीवर काढण्यात आले.त्यामुळे अनेक शाळांमध्ये एका शिक्षकालाच सर्व वर्ग सांभाळावे लागत आहेत.