सावित्रीदेवी फुले वसतिगृहाच्या अधीक्षिका निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी चौकशीसाठी स्थापन समितीच्या प्राथमिक अहवालानंतर वसतिगृहाच्या अधीक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर करण्यात आली आहे.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना मदत म्हणून तिच्या भावाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.