औसा तालुक्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील समदर्गा शिवारात एका 25 वर्षे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (तारीख 15) रोजी दुपारी उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील समदर्गा येथील प्रमोद दिलीप पवार (वय 25 रा. समदर्गा ता. औसा) असे मत तरुणाचे नाव आहे. या संदर्भात भादा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समदर्गा येथील प्रमोद दिलीप पवार यांनी स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे.

त्यांच्याजवळ कसलीही सुसाईड नोट सापडलेली नसल्यामुळे आत्महत्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत प्रमोद हा त्यांचा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या दोन बहिणींपैकी एकीचे लग्न झाले असून आणखी एक बहीण अविवाहित आहे या घटनेची माहिती पोलिसांना समजतात बिट अमलदार देवकते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व भादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.