मंत्रालयात बनणाऱ्या फिल्म स्टुडिओची फाइल गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयात फिल्म स्टुडिओ उभारण्याबाबत माहिती असलेली फाइल मंत्रालयातूनच गायब झाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी योजनांच्या प्रचारासाठी व व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि योजनांवरील मंत्र्यांच्या मुलाखती घेण्यासाठी मंत्रालयात फिल्म स्टुडिओ उभारण्याबाबत ही फाईल होती. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “फाईल गहाळ असल्याचे लक्षात येताच संबंधित विभागाचे कर्मचारी त्या फाईलचा शोध घेत होते. आता आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत”, असे ते म्हणाले.