निधी सिंगची जागतिक स्पर्धेसाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे महापालिकेच्या अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेतंर्गत सराव करणाऱया निधी सिंगची येत्या 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान चीन येथे होणाऱया जागतिक विद्यापीठीय स्पर्धेसाठी (वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स) निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी जिह्यातून निवड होणारी निधी सिंग पहिलीच खेळाडू आहे. ती 400 मीटर हर्डल्स आणि 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सहभागी होणार आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी निधी आगामी स्पर्धेतही दमदार कामगिरी करील, असा विश्वास तिचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी व्यक्त केला.

सर्वोत्तम कामगिरी करणार
– निधी सिंग
‘मी चार वर्षानंतर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. मी खरोखर आनंदी आहे. आता स्पर्धेत माझे सर्वोत्तम देणे हेच ध्येय आहे.’’