दिल्ली मेट्रोची तळीरामांना भेट; प्रत्येक प्रवाशाला दारूच्या दोन बाटल्या नेण्याची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली मेट्रोने शुक्रवारी स्पष्ट केलं की एक प्रवासी दारूच्या दोन सीलबंद बाटल्या घेऊन जाऊ शकतो.

ट्विटर युजरनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या अधिकृत हँडलने ट्विट केले, ‘दिल्ली मेट्रो मध्ये दारूच्या 2 सीलबंद बाटल्या नेण्याची परवानगी आहे.’

अलीकडेपर्यंत, दिल्ली मेट्रोवर विमानतळ एक्स्प्रेस लाईन वगळता मद्य वाहून नेण्यास बंदी होती.

‘त्यानंतर, सीआयएसएफ आणि डीएमआरसीच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीने यादीचे पुनरावलोकन केले आणि सुधारित यादीनुसार, विमानतळ एक्स्प्रेसवरील तरतुदींप्रमाणे दिल्ली मेट्रोमध्ये प्रति व्यक्ती दोन सीलबंद दारूच्या बाटल्या वाहून नेण्यास परवानगी असल्याचं डीएमआरसीनं एका निवेदनात म्हटलं आहे.

मेट्रोच्या आवारात दारू पिण्यास अजूनही सक्त मनाई आहे, असं देखील त्यात म्हटलं आहे. मेट्रो प्रवाशांनी प्रवास करताना योग्य काळजी घेण्याची विनंती केली आहे, असंही त्यांनी पुढं जोडलं आहे.