शिक्षक सिनेटसाठी 90 टक्क्यांहून अधिक मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या शिक्षक सिनेटच्या 10 प्रतिनिधींसोबत विद्या परिषदेच्या तीन सिनेटसाठी आज मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांमध्ये सुरळीत मतदान पार पडले. सरासरी 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची अधिकृत माहिती विद्यापीठाकडून गुरुवारी, 6 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.

शिक्षक आणि विद्या परिषदेच्या या निवडणुकीसाठी एकूण 28 मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. मुंबईसह ठाणे आणि रायगड जिह्यांत सरासरी 91 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची नोंद आहे. शिक्षक सिनेटच्या 10 सदस्यांसाठी एकूण 35 जण रिंगणात होते. विद्या परिषदेच्या तीन जागांसाठी एकूण 13 उमेदवार मैदानात होते. त्यात खुल्या प्रवर्गातून 7 जण तर महिला प्रवर्गातून 5 आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून एक उमेदवार मैदानात होता.