
पीएमपीएल बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या हातातील बांगड्या चोरी करणार्या दोघांना बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 20 हजारांचे पाच तोळे दागिने जप्त करण्यात आले असून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अमित नाना चव्हाण (रा. ससाणेनगर), शुभम सत्यवान ढोले (रा. थेऊर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोर्यांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर बंडगार्डन पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते. या दरम्यान मिळालेल्या माहितीनूसार अंमलदार अनिल कुसाळकर, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांच्या पथकाने चव्हाण आणि ढोले या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या मिळून आल्या. अधिक चौकशी दरम्यान त्यांच्याकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यातील दोन आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, अंमलदार मोहन काळे, सुधीर घोटकुले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

























































