म्हाडाच्या घरांसाठी आजही अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुंबई म्हाडा मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवार 11 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेले दोन-तीन दिवस म्हाडाच्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व्हर बंद होता. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली आहे किंवा ज्यांना कागदपत्रे अपलोड करायची आहे त्यांना संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहेत. ऑललाईन अर्ज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर अनामत रकमेचा भरणा रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत करता येणार आहे. ज्यांना एनईएफटी किंवा आरटीजीएस करायचे आहे त्यांना 12 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई म्हाडा मंडळाकडे आतापर्यंत 1 लाख 36 हजार 839 अर्ज आले असून त्यापैकी 1 लाख 9 हजार 883 जणांनी अनामत रक्कम भरली आहे.