
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बिनखात्याचे मंत्री असलेल्या अजित पवार गटाच्या आठ मंत्र्यांना आज दालनाचे आणि बंगल्याचे अखेर वाटप करण्यात आले. पूर्वी मंत्री असताना सलग पंधरा वर्षे ‘रामटेक’सारख्या प्रशस्त बंगल्यात वास्तव्यास असणाऱया छगन भुजबळ यांना मंत्रालयासमोरील बंगला देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. आदिती तटकरे यांना दिलेल्या बंगल्यात अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
छगन भुजबळ – ब-6 सिद्धगड – मंत्रालय मुख्य इमारत दालन क्रमांक 201, हसन मुश्रीफ – क-8 विशाळगड -विस्तारित इमारत दालन क्रमांक 407, दिलीप वळसे–पाटील – क-1 सुवर्णगड – मुख्य इमारत दालन क्रमांक 303, धनंजय मुंडे – क-6 प्रचितगड – विस्तारित इमारत दालन क्रमांक 201 ते 204 आणि 212, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना सुरुची इमारतीत निवासस्थानासाठी जागा देण्यात आली आहे.





























































