
बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी महम्मद हनीफ मानसुरी रा. अंधेरी वेस्ट मुंबई याच्याविरूध्द लातुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोविंद मारूती मचकटे प्रभारी दुय्यम निबंधक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, महम्मद हनीफ मानसुरी रा. मुन्नाभाई चाळ, गावदेवी डोंगर, अंधेरी वेस्ट मुंबई याने बनावट कागदपत्रे तयार करून दस्ताची नोंदणी केली. ग्रामपंचायत महाराणा प्रताप नगर लातूर येथील नमुना 8 अ बनावट कागदपत्रे तयार करून तो खरा आहे असे भासवून दस्ताची नोंदणी करण्यासाठी त्याचा वापर केला. सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 लातूर कार्यालयाची फसवणूक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक पोगुलवार हे करीत आहेत.




























































