
लातूर दि. ई चलनाच्या व्यतिरिक्त 4500 रुपयांची लाच स्विकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात निलंगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अश्विनी जाधव अडकल्या. निलंगा येथील पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय निलंगा येथे सर्च रिपोर्ट, सूची क्र.2, मूल्यांकन व नकला मिळणे कामी दाखल केलेल्या वेगवेगळ्या अर्जात माहिती व नकला पुरविण्यासाठी अश्विनी दत्तात्रय जाधव (वय 47 वर्षे, पद- कनिष्ठ लिपिक, दुय्यम निबंधक कार्यालय, निलंगा) यांनी ई-चलनाच्या व्यतिरिक्त शुल्क च्या नावाखाली 4500 रुपयांची लाच स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
























































