मुंबईत गेल्या चोवीस तासात 200 मिमी पावसाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडवली आहे. शहराच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्या दरम्यान शहरात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने ही नोंद केली आहे.

गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुलाबा येथील वेधशाळेने 223 मिमी तर सांताक्रुझ येथील वेधशाळेने 145 मिमी पावसाची नोंद केली आहे. मुंबईच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. त्यात राम मंदिर येथे 161 मिमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 153 मिमी, भायखळा येथे 119 मिमी, शीव येथे 112 तर वांद्रे येथे 106 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.