तर ते दहा जागाही जिंकू शकत नाही, माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp logo flag

देशभरातील वाढती बेरोजगारी व महागाईवरून सध्या भाजपविरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. विरोधी पक्ष यावरून सतत भाजपला घेरत आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनी राज्यातल्या बेरोजगारी आणि महागाईवरून केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजला खडेबोल सुनावले आहेत.

जम्मू आणि कश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची भाजपाला भीती वाटतेय हे पाहून आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही, ते विधानसभा निवडणूक घ्यायला घाबरतायत. लोकांमधला संताप त्यांना दिसतोय. सध्याच्या परिस्थितीत त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. त्यांना जागाच जिंकता येणार नाहीत. आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये कदाचित दहा जागासुद्धा जिंकू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांचं राजकीय भवितव्य हे लोकांना विभाजित करण्यावर अवलंबून आहे, अशा शब्दात ओमर अब्दुल्ला यांनी भाजपला फटकारले आहे.