
>>प्रसाद ताम्हणकर
सध्या संपूर्ण जग वेगवेगळय़ा नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हिंदुस्थानात दिल्लीसारखे राजधानीचे शहर आणि देशाचा चाळीस टक्के भाग अतिवृष्टीचा सामना करतो आहे, तर उरलेला भाग अजूनही पावसासाठी आसुसलेला आहे असे विचित्र दृश्य दिसत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आणि हजारो हेक्टर जमीन पुरामुळे पाण्याखाली गेल्याच्या संकटातून अजूनदेखील न सावरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा अतिवृष्टीचा सामना करत आहे. या संकटात लाहोरसारख्या शहरात आतापर्यंत दोन डझन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संपूर्ण युरोप उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळून निघाला आहे. संयुक्त राष्ट्राने या संकटाचे वर्णन ‘सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्ती’ असे केले आहे. ही उष्णतेची लाट आणखी नवे पाम रचण्याचा धोकादेखील वर्तवण्यात आला आहे.
महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात होत असलेली वाढ, एकूण तापमानात होत असलेली वाढ आणि अंटार्क्टिकामध्ये एकामागोमाग एक बर्फ वितळण्याच्या घटनांनी हवामान शास्त्रज्ञांची चिंता अधिक वाढवली आहे. या सर्व नैसर्गिक आपत्तींचा थेट संबंध जलवायू परिवर्तन अर्थात ग्लोबल वॉर्मिंगशी लावण्याची लगेच घाई करण्यास शास्त्रज्ञ तयार नसले, तरी जीवाश्म इंधन आणि एल निनो अर्थात 2018 पासून हवामान बदलाची होत असलेली नैसर्गिक प्रािढया यांच्यामुळे होत असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी जणू एखाद्या अज्ञात प्रदेशात येऊन पोहोचली आहे, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. यापूर्वी इतर कोणत्याही काळात हवामानाचे विविध घटक एकाच वेळी वेगवेगळय़ा आपत्तींना तोंड देत असल्याचे अभ्यासात समोर आलेले नाही. येणाऱया काळात मानवाला अजून भीषण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.
या उन्हाळ्यात आतापर्यंत हवामानाचे चार पाम मोडले गेले आहेत. जुलैमध्ये आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली, तर जून हा जागतिक स्तरावर सर्वात उष्ण महिना होता. या वेळी 2016 मध्ये जागतिक स्तरावर नोंदवला गेलेला सर्वाधिक तापमानाचा पाम मोडीत निघाला. कोपर्निकस या युरोपियन युनियनच्या हवामान निरीक्षण संस्थेच्या अहवालानुसार या वर्षी 6 जुलै रोजी जागतिक सरासरी तापमान 17.08 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. ग्लोबल वॉर्मिंगच्या या कारणामागे तेल, कोळसा आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जनदेखील सामाविष्ट आहे. त्याच वेळी महासागरांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आली आहे आणि अंटार्क्टिक समुद्रातील बर्फात पामी घट झाली आहे. हवामानात होत असलेले हे आश्चर्यकारक बदल येणाऱया काळात पृथ्वी आणि मानवासाठी काय परिणाम करतील याविषयी आता हवामान तज्ञ अभ्यास करत आहेत.
खरे तर एल निनोचे जागतिक परिणाम ते सुरू झाल्यानंतर पाच ते सहा महिने दिसून येत नाहीत. मात्र या वेळी वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे जून महिन्यात तापमानाचे अनेक पाम मोडीत निघाल्याचे समोर येत आहे. शास्त्रज्ञांना या गोष्टीचेदेखील आश्चर्य वाटत आहे. हवामान बदलातील या घडामोडींमागे 100 टक्के मानवाचा हात आहे असे काही शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगत आहेत. हे वाढणारे तापमान कमी होण्याची शक्यता सध्यातरी वाटत नसल्याची भीतीदेखील ते व्यक्त करतात. 1800 साली औद्योगिकरण सुरू झाले आणि तेव्हापासून मानवाने अनेक दूषित वायू वातावरणात सोडण्यास सुरुवात केली आहे. या प्रदीर्घ कालावधीचे दुष्परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे असे अनेक हवामान अभ्यासकांना वाटते आहे.
जुलै महिन्यात अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाच्या साठय़ात पामी घट झाली आहे. 1981 ते 2010 सालापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत अंटार्क्टिकमधील युकेच्या (ळख्) 10 पट क्षेत्रफळ आतापर्यंत वितळले आहे. ही एक मोठी धोक्याची घंटा असून. या घटनेचा हवामान बदलाशी किती संबंध आहे याचा युद्धपातळीवर अभ्यास सुरू आहे. येणारा काळ नैसर्गिक आपत्तींनी भरलेला असणार आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी, त्याचे परिणाम कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने आतापासून एकत्र प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हे नक्की!


























































