
>>डॉ. ज्योती धर्माधिकारी
काही हिंदुस्थानी उल्लेखनीय शैक्षणिक संस्था आहेत, ज्या देशाच्या बाहेर आपले कॅम्पस निर्माण करत आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (आयआयटी मद्रास) या संस्थेचा नवीन कॅम्पस टांझानिया येथील झांझिबार येथे सुरू होत आहे. हिंदुस्थान आणि टांझानिया यांच्यातील एका करारानुसार शैक्षणिक देवाणघेवाणीचे मार्ग मोकळे झाले. टांझानियातील कॅम्पसच्या संचालक म्हणून एका महिलेची नियुक्ती झाली आहे. आयआयटी मद्रासच्या एकूणच कारकीर्दीमध्ये पहिली महिला संचालक म्हणून प्रीती अघालयम यांची नियुक्ती ही स्त्राr-पुरुष समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामध्ये ज्याप्रमाणे परदेशी शैक्षणिक संस्था हिंदुस्थानमध्ये आपले नवीन कॅम्पस निर्माण करत आहेत, त्याचप्रमाणे काही हिंदुस्थानी उल्लेखनीय शैक्षणिक संस्था आहेत, ज्या देशाच्या बाहेर आपले कॅम्पस निर्माण करत आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ही त्यापैकीच एक संस्था आहे. या संस्थेला जागतिक नामांकनही प्राप्त आहे.
हिंदुस्थानातले आयआयटी मद्रास ही सर्वोच्च, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झाली. आयआयटी मद्रासचा नवीन कॅम्पस टांझानिया येथील झांझिबार येथे सुरू होत आहे. हिंदुस्थान आणि टांझानिया यांच्यातील एका करारानुसार शैक्षणिक देवाणघेवाणीचे मार्ग मोकळे झाले. टांझानियातील कॅम्पसच्या संचालक म्हणून एका महिलेची नियुक्ती झाली आहे. आयआयटी मद्रासच्या एकूणच कारकीर्दीमध्ये पहिली महिला संचालक म्हणून प्रीती अघालयम यांची नियुक्ती ही स्त्राr-पुरुष समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
हिंदुस्थानमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांचा शिरकाव होऊन अनेक वर्षे झाली. 1944 मध्ये अय्यलासोमजुला ललिता आणि लीलाम्मा यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजेश्वरी चटर्जी यांनी अभियांत्रिकी शिक्षण मिशिगन विद्यापीठातून पूर्ण करून स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली अभियंता व पहिली अभियांत्रिकी प्राध्यापक असा मान मिळवला. शकुंतला भगत या पहिल्या स्थापत्य अभियंता स्त्राrने तर काश्मीरच्या दुर्गम भागात पूल निर्माण करून आपली नाममुद्रा उमटवली. मात्र असे असूनही स्त्रियांचे प्रमाण एकूणच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत कमी आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये म्हणजे संगणकाच्या क्रांतीनंतर मुलींचे प्रमाण वाढले आहे. तरीही काही वैशिष्टय़पूर्ण क्षेत्रातच मुलींचे प्रमाण आहे हेही तितकेच खरे. सुधा मूर्तीसारख्या महिलांना अभियंता शिक्षण घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला हेही नजरेआड करून चालणार नाही. आजही ही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. 2022-23 या शैक्षणिक वर्षात मुलींचे अभियांत्रिकीतील प्रमाण केवळ 20 टक्के आहे. हिंदुस्थानच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालकपदी एक महिला असणे हा समस्त हिंदुस्थानी स्त्रियांच्या स्त्राrत्वाचा मोठा सन्मान म्हणून साजरा व्हायला पाहिजे.
प्रीती यांचे वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते तर आईही उच्चशिक्षाविभूषित आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या प्रीतीचा शैक्षणिक आलेख हा नेहमीच उंचावलेला राहिला आहे. प्रीती यांनी 1995 मध्ये आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, 2000 मध्ये त्यांना मेसेच्युसेट्स एमहस्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. पोस्टडॉक्टरल संशोधन एमआयटी, केंब्रिज येथून पूर्ण झाल्यावर त्या आयआयटी मुंबई येथे प्राध्यापकपदी रूजू झाल्या. सध्या त्या आयआयटी मद्रास येथे केमिकल इंजिनीअरिंग या विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. यासोबतच आयआयटीच्या विविध प्रकल्पांवर सदस्य म्हणून त्या कार्यरत असतात. झांझिबार येथे कॅम्पस सुरू करण्याच्या उद्देशाने झांझिबारला अनेकदा भेट देण्याची संधी अघालयाम यांना मिळाली. तेथील परिस्थिती, सामाजिकता त्यांना जवळून बघता आली.
त्यातच संचालकपद त्यांना देण्यात आल्यानंतर त्यांना त्याचा विशेष आनंद झाला. मात्र हे काम सोपे नसावे. एका वेगळ्या देशात हिंदुस्थानी शैक्षणिक संस्था निर्माण करून त्याचे प्रशासन करणे हे नक्कीच आव्हानात्मक आहे. मात्र प्रीती या आश्वस्त आहेत, आपण या कामाला पूर्ण न्याय देऊ शकू याबद्दल त्यांना पुरेशी खात्री आहे.
संचालकपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्या म्हणाल्या की, ही जबाबदारी म्हणजे माझ्या शिक्षणाचा एक प्रकारे सन्मानच आहे. जेव्हा मी झांझिबारला गेले तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, तेथे महिलांच्या प्रतिनिधित्वाला फार महत्त्व दिले जाते. तेथे अनेक क्षेत्रांत महिला उच्च स्थानी आहेत. अशा वेळी हिंदुस्थानी आयआयटी कंपनीचे संचालक म्हणून माझी नियुक्ती हा माझा सन्मान आहे. आयआयटी संस्थेसाठी आणि हिंदुस्थानसाठी मी संपूर्ण जबाबदारीने कर्तव्य पार पाडेन आणि हिंदुस्थानचे नेतृत्व करेन.
शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे, प्रवेश प्रािढया सुरू झाली आहे. ऑक्टोबरमध्ये प्रीती रूजू होतील. अभ्यापामाचे नियोजन आणि संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावर आहे.
आयआयटी मद्रासमध्ये केवळ बारा टक्के महिला अध्यापक आहेत. महिला अध्यापकांची टक्केवारी ही वाढायला हवी. तंत्रज्ञान शिक्षणामध्ये मुली नसणे याचे कारण मुलींच्या शिक्षणाबद्दल मत पूर्वग्रहदूषित आहे, असे त्या मानतात. अर्थात त्या स्वतच्या नियुक्तीकडे महिला संचालक अशा पद्धतीने बघत नाहीत, तर आयआयटी मद्रासच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्ती म्हणून बघतात. देशाबाहेरील संस्थेमध्ये आत्मविश्वासपूर्ण काम त्यांच्याकडून होईल याची खात्री वाटते. संचालक पदासारखे महत्त्वाचे आव्हानात्मक काम करण्याची त्यांची पात्रता आहे हे महत्त्वाचे. याच घटनेचा असाही अर्थ निघतो की, पुरुषी वर्चस्व असलेल्या प्रमुख पदावर स्त्रियाही आत्मविश्वासाने जबाबदारी पेलू शकतात हे मान्य होत आहे. त्यामुळे मुलींना तंत्रज्ञान शिक्षणाकडे वळण्याची एक नवी प्रेरणा, उमेद मिळावी.
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)





























































