मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर त हार्बरवर पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱया मेल/एक्प्रेस गाडय़ा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून बाहेर जाणाऱया एक्सप्रेस गाडय़ा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत पनवेल/बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱया अप मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱया डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहेत.