बनावट एनओसीवर जात होत्या कुवेतला; तिघींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळ दूतावासाच्या बनावट एनओसीवर नोकरीसाठी कुवेतला जाणाऱया तीन महिलांना सहार पोलिसांनी अटक केली. त्या तिघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते. एका एजंटने 15 हजार रुपये घेऊन बनावट एनओसी त्या तिघींना दिल्याचे तपासात समोर आले आहे.

मूळच्या नेपाळच्या रहिवासी असलेल्या त्या तिघी शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या. तेव्हा गस्तीला असलेल्या विमानतळावरील अधिकाऱयाने त्यांच्या पासपोर्टची तपासणी केली. त्याने पासपोर्ट, विमान तिकीट, नेपाळ दूतावासाची एनओसी दाखवली. अधिकाऱयांना त्या एनओसीबाबत संशय आला. कुवेतला नोकरीसाठी त्याना नेपाळ दूतावासाच्या एनओसीची आवश्यकता होती. एनओसीसाठी त्याने एका एजंटला संपर्क साधला. त्याने 15 हजार रुपये घेऊन त्यांना नेपाळ दूतावासाचे एनओसी मिळवून दिले होते. बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी त्या तिघींना सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सहार पोलिसांनी त्या तिघींना अटक करून न्यायालयात हजर केले होते.